
साधारण ई.स. पूर्व २००० बीसीई पासून दही अस्तित्वात असल्याच्या नोंदि आहेत पण दही असं कोणी पहिल्यांदा तयार केलं नव्हत तर त्याकाळी बकरीच्या कातडीपासून तयार केलेल्या पिशव्या दूध ने आण करण्याकरता वापरत असत आणि ह्या कातडी वर दही तयार करणारे जीवाणु असतील आणि त्यामुळेच त्या पिशवितच त्याच दही झालं असेल असं मानल जात. हि झाली दही तयार होण्याची मूळ कहाणी पण प्रत्येक देशात अगदी आवडीनं खाल्ला जाणारा हा पदार्थ स्वतःबद्दल वेगवेगळ्या आख्याईका बाळगून आहे. पुराण काळात भारत आणि इराण ह्या देशांच्या संस्कृतीत दह्याचा उल्लेख अगदी प्रकर्षानं आढळतो, म्हणजे जर तुम्ही नीट विचार केलात तर देवाच्या पुजेत जे तिर्थ दिलं जात ते बर्याच वेळेला दह्याच असतं, पुराणात दही आणि मध ह्यांच मिश्रण हे देवांच अन्न म्हणून मानल गेलं आहे.
अगदी १९ व्या शतकापर्यंत आशिया खंडातील बहुतेक देशात दही हे रोजच्या जेवणाचा एक अविभाज्य भाग होत. साधारण १९०५ साली बल्गेरियाच्

दही हे आरोग्याला उत्तम असतं त्यात प्रोटिन, कॅल्शियम, आणि विटामिन बी चा भरपूर साठा सापडतो. कॅल्शियमच्याही अस्तित्वामुळे हे वजन कमी करण्याचा पण एक उत्तम उपाय म्हणून ज्ञात आहे. दही हे अतिसारासारख्या विकारांवर प्रतिजैविक म्हणून पण वापरात आणतात. आपली पूर्वीची लोक म्हणतात दही हे पित्तनाशक असतं पण ते जेव्हा ते खूप घुसळून त्याच ताक करतात तेव्हा ते शरीराला थंडावा देणार एक उत्तम पित्तनाशक बनत. म्हणूनच कदाचित हिंदू संस्कृतीत जेवण झाल्यावर ताक प्यायची पद्धत असावी. दुधाच्या सायीपासून तयार केलेलं दही जेव्हा घुसळलं जात तेव्हा त्यातून लोणी निघत आणि पुढे ह्याच लोण्यातून कढवुन तुप केलं जात. आपल्या देशात दही वेगवेगळ्या पद्धतिने खाल्ले जात. लस्सी हा प्रकार उत्तर भारतात जास्त प्रसिद्ध आहे, साखर आणि सुकामेवा घालून केलेलं घट्ट ताक म्हणजे लस्सी. दक्षिण भारतात दह्यापासून केलीली कढि हि रोजच्या जेवणाचाच भाग असते. भात आणि त्यावर कढि म्हणजे त्यांच्या तोंडाला पाणी सुटल्या शिवाय रहात नाहि. दही पुष्कळ प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थात पण वापरल जात. असं हे बहुपयोगी दही ज्याची जितकी माहिती सांगावी तेवढी थोडीच.
चांदीचा रुपया दुधात टाकून दही लावण्याची पद्धत आहे.
ReplyDeleteतोंडाला पाणी सुटले रे !!! मि पन डाय हार्ड फॅन आहे रे
ReplyDeleteदुधामध्ये लिंबुचे दोन चार थेंब टाकले तरी दहि बनते.