काल आपली यमु म्हणजे रमाबाई मोठ्या झाल्या आणि त्याहि चांगल्या चार पाच वर्षांनी. खूप दिवसांपासून ज्याची वाट पहात होतो ते एकदाच झाल आणि मालिका थोडि पुढे सरकली. म्हणजे आता

बाल रमाबाईची भूमिका करणार्या तेजश्रीच कराव तेवढं कौतुक थोडच. तिनं त्या भूमिकेचं सोनं केल. शेवटि शेवटि तर असं वाटायला लागल होत कि निर्मात्यांना पण रमाबाईला मोठे करण्यामध्ये बहुतेक तूर्तास तरी रस नसावा. बाल रमेच ते लाडिक स्वरातल बोलण "माझी आई म्हणते" कायम लक्षात राहिल हे नक्की.
कालचा भाग विशेष एक तासाचा होता. कालच्या भागातील बहुतेक सगळ्या पहिल्या घटना अगदी टिपीकल वाटल्या. भागाच्या शेवटि रमा मोठि झाली. खूप उत्सुकता ताणली आणि जेव्हा मोठि रमा समोर आली तेव्हा तोंडातून एकदम बाहेर आलं अरे हि तर आपली "कुहु (एका लग्नाची दुसरी गोष्ट मधली)". काल कुहु म्हणजे स्पृहा जोशी रमाबाईच्या गेट अप मध्ये खूपच छान दिसत होती. कालच्या भागात तिला फार अस करण्यासारखे काहिच नव्हत. जाता जाता एक मान्य कराव लागेल छोट्या तेजश्रीनं स्पृहा पुढे मोठे आव्हान ठेवल आहे आणि येणार्या पुढच्या काहि भागांमधून अंदाज येईलच कि स्पृहा हि भूमिका कशी पेलेल ते. तोपर्यंत मालिका बघत रहायला काहिच हरकत नाहि.
स्पृहाच ह्या नव्या भूमिकेबद्दल अभिनंदन आणि ALL THE BEST !!!
No comments:
Post a Comment