Tuesday, September 14, 2010

"आशयघन" ह्या माझ्या नवीन ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत. प्रथम आपण "माझ्या विश्वात.." ला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद!. खरतर हा नवीन ब्लॉग चालु करायच प्रयोजनच मुळी लिखाणातल माझं वाढलेल धाडस. दोन - अडीच वर्षांपूर्वी जेव्हा "माझ्या विश्वात.." सुरु केला तेव्हा मनात यत्किंचितही विचार नव्हता कि मी हा प्रवास इथपर्यंत चालु ठेवीन. मजा म्हणून सुरुवात केलेल्या लिखाणच आवडीत कधी रुपांतर झाले कळलच नाहि. बरच सुचत असत, लिहावस वाटत पण वेळेअभावी राहुन जात. आता जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा "माझ्या विश्वात.." चा सगळा प्रवास अगदी डोळ्यासमोरून जातो आणि खूप छान वाटत.

आता थोडं "आशयघन" ह्या नावा विषयि "आशय" म्हणजे अर्थ त्यामुळे ह्या ब्लॉगवर काहीतरी अर्थपूर्ण लिखाण कराव असा मानस आहे. म्हणजे सध्या डोक्यात अशी कल्पना आहे कि "माझ्या विश्वात.." हा संपूर्णपणे ललित लिखाणावर अधारीत असेल तर "आशयघन" मध्ये ललित लिखाणा शिवाय इतर लेख प्रसिद्ध करण्याचा आग्रह असेल.

माझ्या ह्या नवीन प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असतीलच ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे.

No comments:

Post a Comment