Monday, October 01, 2012

पहिला मानवी बॉंम्ब

काल रात्री "टिव्ही" वर एक इंटरेस्टिंग कार्यक्रम पहाण्यात आला. "The Cult of the Suicide Bomber", मानवी बॉम्ब ह्या संकल्पनेचा शोध घेण्याचा प्रयत्न ह्या कार्यक्रमात घेण्यात आला होता. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या भारतीयांना मानवी बॉम्ब हि संकल्पना प्रथम स्व. राजीव गांधी ह्यांच्या हत्येनंतर कळली. सार्‍या देशानी ह्या कृत्यावर आश्चर्य व्यक्त केले होत. "The Cult of the Suicide Bomber" ह्या कार्यक्रमात जगात जे मानवी बॉंम्ब हल्ले झाले त्याबद्दलची माहिती फार सुरेख पद्धतीने देण्यात आली होती. हा कार्यक्रम भूतपूर्व CIA Agent, .Bob Baer ह्यांनी प्रस्तुत केला होता.

कार्यक्रमाची सुरूवात जगातला पहिला मानवी बॉम्ब कोण ह्या विषयाने होते. जगातला पहिला मानवी बॉम्ब हा इराणमध्ये जन्माला आला होता आणि त्याच नाव हुसेन फाहमद. तर हा हुसेन अवघा तेरा वर्षाचा असताना मानवी बॉम्ब बनून मरण पावला. म्हणजे घडले अस कि साधारण १९८० साली इराकनी आपला शेजारी राष्ट्र असलेल्या इराणवर हल्ला केला. ह्या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याकरता जवळ जवळ प्रत्येक इराणी रस्त्यावर उतरला होता. त्यावेळचे इराणचे सर्वेसर्वा आयुतुल्हा खोमानी ह्यानी राष्ट्र आणि धर्म वाचवण्याकरता मदतीची हाक दिली, आणि त्यांच्या ह्या हाकेला इराणी धावून गेला. आपला देश आपला धर्म ह्याच्या संरक्षणाकरता घराघरातून लोक बाहेर येऊ लागले. त्यातलाच एक हुसेन फाहमद फक्त तेरा वर्षाचा कोवळा मुलगा. जेव्हा इराणच्या दक्षिणेकडे ईराक मोर्चेबांधणी करण्यात यशस्वी होत होता तेव्हा हा चिमुरडयानं आपल्या अंगावर स्फोटके लावून ईराकि टॅंकरच्याखाली स्वतःला झोकून दिले, ज्यामुळे ईराकि सेनेला मागे हटण्यापासून काहिच पर्याय ऊरला नव्हता. आणि अशाप्रकारे हुसेन फाहमद हा जगातला पहिला मानवी बॉम्ब ठरला. इराणची राजधानी असलेल्या तेहरान ह्या शहराच्या बाहेर एक मोठे कबरस्तान आहे. तिथे ह्या युद्धात शहिद झालेल्या हजारो लोकांच्या कबरी आहेत. कबरस्तानच्या मधोमध एक कबर आहे ती म्हणजे ह्या हुसेनची. आजही इराणमध्ये हुसेन हा एक महान शहिद म्हणुन ओळखला जातो.

पुढे बॉब आपल्याला तेहेरानच्या बाहेर असलेल्या हुसेनच्या घरी घेऊन जातो. बॉब आपल्याला हे सांगायला विसरत नाहि कि तो ह्या घराला भेट देणारा पहिला पाश्चिमात्य आहे. तो हुसेनच्या आई वडलांना भेटतो त्यांच्याशी बोलतो. हुसेनच्या आई आणि वडलांना त्याच्या मुलाचा खूप अभिमान वाटतो. त्याची आई सांगते तो एक दिवस शाळेतुन घरी आला आणि आईला युद्धावर जायची परवानगी मागायला लागला. त्याच्या आईनपण त्याला होकार दिला. तिच्या म्हणण्याप्रमाणे हा मार्ग त्याला "खुदा" नी दाखवला होता तेव्हा ती त्याला अडवणारी कोण? हुसेनचे वडिल मोठ्या अभिमानानं सांगतात कि इराणमध्ये शाळेत मुलांना हुसेनच्या हौतात्म्याची कहाणी शिकायला आहे.

असा हा जगातला पहिला मानवी बॉम्ब हुसेन फाहमद, आपल्या राष्ट्रभूमीच्या संरक्षणाकरता शहिद झाला. पण मानवी बॉम्ब बद्दल आजच सत्य हे फारच विदारक आहे. १९८० साली हुसेनन दाखवलेला हा मार्ग पुढे दहशतवाद्यांच प्रमुख अस्त्र बनेल अस तेव्हा कोणाला वाटलंही नसेन. हे पाहुन मनात विचार आला, इराणकरता असलेल हुसेनच हे बलिदान सार्‍या जगाला शाप तर ठरलं नाहि ना...

No comments:

Post a Comment