Wednesday, December 12, 2012

अवयव दान

आज Times Of India ला एक वेगळीच बातमी वाचली. दिल्लीतील एका दांपत्यानं आपल्या मृत मुलाचे शक्य तेवढे अवयव दान केले. वाचुन अंगावर शहारा आला पण खरच किती छान कल्पना आहे. माणूस मेल्यावर त्याच शरीर नश्वर होत. जो माणूस गेला त्याला त्याच्या शरीराचा काहिच उपयोग नसतो. पण जर त्याच्या शरीरातील अवयवांमुळे अजुन चार लोकांचे प्राण वाचणार असतील तर ह्याच्यापेक्षा अजुन चांगली गोष्ट ती कुठली.

पूर्व दिल्लीतील जुनेजा पती पत्नीनं ह्या महान कार्याची जणू मुहूर्तमेढ रचली. जुनेजा दांपत्याचा एकुलता एक २१ वर्षाचा मुलगा अनमोल ज्याचा रोड अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. प्रथम तर हे पचवणे किती जड आहे कि हाता तोंडाशी आलेला आपला मुलगा नियतीनं असा हिरावून घेतला. पण ह्या दुखातून बाहेर येऊन हा धाडसी निर्णय घेण नक्कीच सोपं नाहि. अनमोलचा अपघात शुक्रवारी झाला डॉक्टरांच्या पथकानी त्याचा ब्रेन डेड झाला आहे असा निर्णय दिला. अनमोलच्या काकांनी माहिती दिली कि त्यांनी दोन खाजगी रुग्णालयां बरोबर अनमोलच्या अवयवदान विषयी बोलणी केली पण दिल्लीतल्या AIMS रुग्णालयानं खरी तयारी दाखवली. सोमवारी दुपारी ३:३० वाजता त्याचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. बाकीचे सगळे सोपस्कार होऊन खरी सुरुवात रात्री १०:३० वाजता झाली. त्यांनी अनमोलचे शक्य तितके अवयव काढून घेतले ज्यात त्याच लिव्हर, डोळे, इ. अवयवांचा समावेश होता. त्यात त्याच लिव्हर एका ५८ वर्षाच्या माणसावर लगेच रोपण पण करण्यात आल जो मृत्यू शय्येवर होता. AIMS चे डॉ. मिश्रा म्हणतात कदाचित असं पहिल्यांदाच होत असेल. अनमोलच्या अवयवांचा उपयोग जवळ जवळ ३४ जणांना होऊ शकतो." त्यांनी पुढे माहिती दिली "जर ब्रेन डेड असेल तर शरीरातले ३७ अवयव परत वापरता येतात, पण जर हार्ट फेल असेल तर मात्र काहि ठरावीकच अवयव वापरता येतात."

खरच मृत शरीराचं दहन किंवा दफन करण्यापेक्षा असं काहीतरी केल तर किती तरी जणांचे प्राण वाचतील. कित्येक लोक आपल्या मृत्युपत्रात सुद्धा लिहून ठेवतात कि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचं शरीर एखाद्या हॉस्पिटलला दान कराव जेणे करून त्यांच्या शवविच्छेदनाचा मानवी शरीरावर अधिक संशोधन करण्यास उपयोग होईल. अनमोलच्या माता पित्यांना अगदी मनापासून सलाम ज्यांनी आपल्या मुलाच नाव मरणोत्तर अनमोल केलं.

No comments:

Post a Comment